।। संघ हीच शक्ती ।।

वेबसाईट निर्मितीसाठी योगदानश्री. किशोर विष्णू कुडव
श्री. प्रकाश पांडुरंग भांगरथ
श्री. अनंत महादेव शेलार
श्री. पांडुरंग धाऊ खाडे
श्री. रमेश शिवराम म्हसकर
श्री यादव जयराम धानके
श्री दत्तात्रय नागो विशे
श्री मनोहर हिराकांत मडके
श्री. किसन अण्णा सापळे
श्री. पद्माकर पांडुरंग पडवळ
श्री. द्वारकानाथ रामचंद्र जाधव
श्री. दत्तात्रय तुकाराम भोईर

कुणबी समाजोन्नती संघाचे, कुणबी भवन येथील सुसज्ज सभागृह
साखरपुडा, मौज बंधन, वाढदिवस, निरोप समारंभ, मिटिंग ई. साठी सर्व समाजांसाठी उपलब्ध

 • दैनिक भाडे रु. ५०००/-
 • खुर्ची भाडे रु. ५/- प्रती खुर्ची
 • स्पिकर रु. ५००/- प्रतिदिन
 • क्लाससाठी छोटा हॉल उपलब्ध आहे.

संपर्क: ९९३०३५९४३९, ९४२१६२२७७६, ९२२६२४९१४२

।। समाज संघाची वाटचाल ।।

दिव्याची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती...
       जगदगुरु संत तुकोबाराय व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा वारसा घेऊन शुष्क वाळवंटाचे नंदनवन करणाऱ्या व्यक्तिरूपी शक्ती शहापूर तालुक्यातील कुणबी समाजामध्ये जन्माला आल्या, त्यांच्या कार्याच्या सोनेरी इतिहासाची पाने कुणबी समाजाने अभिमानाने जपावी, मिरवावी अशीच आहेत. पूर्वेला सह्याद्री, पश्चिमेला माहुली, उत्तरेला वैतरणा, दक्षिणेला कळू नदी अशा चार नैसर्गिक तटबंदीमध्ये वसलेल्या शहापुर तालुक्यामध्ये त्यावेळी २०८ गांवे ३५० पाडे मिळुन लोकसंख्या सन १९९५ च्या जनगणनेनुसार १ लाख १५ हजार होती. त्यात ६५ हजार कुणबी समाज होता . त्यामध्ये फक्त १२४ जण (इ. ७ वी ), ८ जण मॅट्रिक (एस एस सी, ११ वी ) ३ महाविद्यालयाची पायरी चढलेले व ४३ शासकीय कर्मचारी होते. एवढाच कुणबी समाजाचा विकास, बाकी भले मोठे शून्य. अशा परिस्थितीत कुणबी समाजाच्या विचारवंत नेत्यांच्या मनांत कुणबी समाज संघ स्थापण्याचा विचार जोर धरू लागला. अनेक समाज धुरिणांनी एकमेकांना संपर्क साधून विचार विनिमय करून विखुरलेल्या शक्ती एकत्र आणल्या, त्यामुळे समाजामध्ये चैतन्य निर्माण झाले. कुणबी समाजाला स्वतःच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची व हक्काची आणि शक्तीची सुद्धा जाणीव झाली होती. स्वातंत्र्य सैनिक किसानबाबा भेरे, दत्तात्रय गणपत खाडे यांच्या उपस्थितीत पहिली बैठक धसई येथे झाली, या बैठकीत घटना समितीची स्थापना करण्यात आली. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून श्री रघुनाथ हरड व चिटणीस म्हणून श्री. पां. जा. विशे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. श्री कृष्णाजी गणपत भेरे, धसई, श्री दत्तात्रय गणपत खाडे, बिरवाडी, श्री मंगल पालोजी काठोळे, वशिंद हे घटना समितीचे सन्माननीय सदस्य होते. घटना समितीच्या तीन सभा निवृत्त सर्कल अधिकारी श्री महादेव बालाजी भोईर यांच्या शहापूर येथील निवासस्थानी होऊन कुणबी समाज संघाची घटना तयार करण्यात आली. दि. २२ एप्रिल १९५६ रोजी कांबारे येथे कुणबी समाज संघाची सर्वसाधारण सभा होऊन घटनेला मान्यता देण्यात आली व समाज संघाची स्थापना करण्यात आली. तेजोमय सूर्याच्या साक्षीने शहापूर तालुका सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज संघ या नावाने स्थापन झाला. या संघाचे पहिले अध्यक्ष श्री. गोपाळ राम पा. दांडकर, शिरगाव यांची नेमणूक केली गेली, त्यावेळी अँड. कवळे साहेब, प्रमुख पाहुणे आमदार ल. ना. भोईर, अँड. शांताराम भाऊ घोलप उपस्थित होते. तसेच तालुक्यातील मान्यवर स्वातंत्र्य सैनिक किसानबाबा भेरे श्री दत्तात्रय गणपत खाडे, श्री. हरी रामा भेरे, श्री. मारुती कुशाबा भोईर, श्री. सावळाराम द. भेरे, श्री. हेमा चिमा भेरे, श्री. पांडुरंग जानु विशे, श्री. काळु कृष्णा निपुर्ते, श्री. गोटीराम म्हसकर, श्री. मंगल काठोळे, श्री. खंडू हरी तारमळे या व अन्य मान्यवरांसह समाजाच्या सर्व थरांतील बहुसंख्य लोक उपस्थित होते. त्या दिवसापासून समाज संघाचा कारभार सुरु झाला. समाज संघाच्या स्थापनेमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. समाज जागृतीसाठी शिबीर आयोजनाची मोहीम सुरु झाली. शीळ, ठुणे, पंढरीचा पाडा, बिरवाडी, टहारपूर या ठिकाणी त्या परिसरातील सर्व पक्षीय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सर्व तालुका ढवळून निघाला व समाजसंघाच्या कार्याला चालना मिळाली.

त्यावेळी सामुदायिक विवाह मोहीम राबविण्याचे संघाने ठरवले व त्या अनुषंगाने सन १९५७ पासून शेई येथे १५, मासवणे २१, नांदगाव सो २२, शेळवली (खं) दोन वेळा २५, माळेगाव येथे २५ सामुदायिक विवाह सोहळे पार पडले. एक चांगले पर्व संघाने पार पाडले. पुढे त्याच प्रकारे शहापूर गंगास्थान, गोलभन, कानवे ,बिरवाडी, दळखण, गोलभन, उंबरखांड, धसई, शेंद्रूण, अशा अनेक ठिकाणी हि मोहीम राबवली गेली त्यामुळे सामुदायीक विवाहाने काबाडकष्ट करणारे समाज बांधवांच्या खर्चाची वेळेची बचत होऊ लागली.... त्याच दरम्यान विठ्ठलराव तथा दादासाहेब खाडे शेतीच्या अभ्यासासाठी जपानला गेले ह्या गोष्टीचा समाज संघाला खूप आनंद झाला व अभिमान हि वाटला. समाज संघाने दादांचा निरोप समारंभ घडवून आणला.

अजून वाचा

कार्यकारी मंडळ

श्री. किशोर विष्णू कुडव
अध्यक्ष
श्री. प्रकाश पांडुरंग भांगरथ
उपाध्यक्ष
श्री. अनंत महादेव शेलार
सरचिटणीस
श्री. पांडुरंग धाऊ खाडे
खजिनदार
श्री. रमेश शिवराम म्हसकर
सहचिटणीस
श्री यादव जयराम धानके
सहचिटणीस
श्री दत्तात्रय नागो विशे
सहचिटणीस
श्री मनोहर हिराकांत मडके
सहचिटणीस


विश्वस्त मंडळ

श्री. दशरथ नारायण तिवरे
अध्यक्ष
सौ. विद्या शशिकांत वेखंडे
उपाध्यक्ष
श्री. दौलत बाबु देसले
सचिव
श्री. किशोर विष्णू कुडव
पदसिद्ध सदस्य


स्थापनेपासून कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष

कै. गोपाळराम पा. दांडकर
शिरगांव
१९५६ ते १९५७
कै. गोटीराम आप्पाजी म्हसकर
दळखण
१९५७ ते १९५९
कै. नामदेव गोविंद वेखंडे
कानविंदे
१९५९ ते १९६१
कै. रघुनाथ मल्हारी मडके
शिरगांव
१९६१ ते १९६३
कै. विठ्ठल दत्तात्रय खाडे
बिरवाडी
१९६३ ते १९६५
कै. नामदेव सोलुजी भेरे
बिरवाडी
१९६५ ते १९९०
श्री. गंगाराम चाहू भेरे
किन्हवली
१९९० ते १९९५
श्री. दत्तात्रय बा. पाटील
शहापूर
१९९५ ते २००१
श्री. शंकर कान्हू धिर्डे
लोनाड बु.
२००१ ते २००७
श्री. शंकर केशव खाडे
चेरपोली
२००७ ते २०१७


स्थापनेपासून विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष

 
कै. नामदेव सोलुजी भेरे
बिरवाडी
१९८९ ते २००८
सौ. सुनीताताई सोनु दिनकर
दळखण
२००८ ते २०१४
 
संपूर्ण कार्यकारिणी पहा

आगामी कार्यक्रम


वधु वर सुचक मेळावा २२ मे २०१८ रोजी


स्त्री     पुरुष

संपूर्ण नाव:


पत्ता:


जन्मतारीख:
शिक्षण:


नोकरी/व्यवसाय:


समाज प्रबोधन जाहीर आवाहनकुणबी समाज संघ तालुका शहापूर समाज बांधवांनी रूढी परंपरा व कालबाह्य अनिष्ट चालीरीतींत योग्य तो बदल स्वतःपासून स्वीकारावा त्यासाठी खालीलप्रमाणे सुचना करीत आहोत.
 • साखरपुडा - वधुवर पसंतीनंतर दोन्ही कुटुंबातील मोजक्याच व्यक्तींनी साखरपुडा करावा. शक्यतो विवाहाच्या वेळी केल्यास उत्तम.
 • लग्न समारंभ - लग्न समारंभ एकाच दिवशी उरकावा. शक्यतो वैदिक/नोंदणी पद्धतीने अल्पखर्चात विवाह हि काळाची गरज आहे.
 • जवळच्या कुटुंबातील व्यक्तींनी शक्यतो ग्रुप पद्धतीने विवाह केल्यास नातेवाईक व कुटुंबांना होणारा त्रास कमी करता येईल. मुलामुलीचे लग्न झाल्यानंतर देणगी म्हणुन जास्तीत जास्त देणगी रक्कम समाज संघाकडे जमा करावी.
व्यक्तीचे निधन- कुटुंबातील व्यक्तीचे निधन हे सर्वात मोठे दुःख आहे. अशावेळी अशा कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन सांत्वन करून हे दुःख पेलण्यास आत्मबळ वाढविणे गरजेचे आहे. मात्र पूर्वापार क्रिया कर्म व अनिष्ट रूढी टाळणे गरजेचे आहे.
 • निधनाचे वृत्त कळविताना अंत्यविधीची वेळ कळवावी. अंत्यविधीच्या अगोदर मृत व्यक्तींना स्नान घालणे, अभगिनी लेणे उतरविणे हे कार्यक्रम घरातच जवळच्या नातेवाईकांनी उरकावे. अंत्यविधीच्या वेळी एखाद्या जेष्ठ व्यक्तीने सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करावी.
 • रक्षा भरणे - सदर कार्यक्रम कुटुंबीय व जवळचे नातेवाईक यांनीच उरकावा.
 • उत्तरकार्य व रात्रीचा कार्यक्रम एकाच दिवशी करावा. वारसांनी मयत व्यक्तीच्या स्मरणार्थ जास्तीत जास्त देणगी समाज संघास देण्याचे करावे.
 • पाणवठ्याच्या कार्यक्रम घराजवळ ठेवावा. प्रथम पागोटे बांधण्याचा कार्यक्रम त्यानंतर मृत व्यक्तीचा फोटो ठेऊन सार्वजनिक श्रद्धांजली फक्त एका व्यक्तीने किंवा कमाल तीन व्यक्तींनी अर्पण करावी. नंतर भोजनाचा कार्यक्रम करावा.सभासद नोंदणी व इमारत निधीसाठी आवाहन

समाजसंघाची बांधणी प्रभावी करण्यासाठी सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते कि त्यांनी स्वेच्छेने कमाल रक्कमेचे सभासदस्यत्व स्वीकारून आर्थिक हातभार लावावा. त्याकरिता संपर्क साधावा, हे विनम्र निवेदन.
 • प्रत्येकी प्रवेश फी रु. १०/-
 • आजीव सभासद रु. १०००/-
 • आश्रयदाता रु. ५०१/-
 • हितचिंतक रु. २५१/-
 • तसेच ५०००/- व त्यावरील इमारत निधी देणाऱ्या समाजबांधवांची नावे संगमरवरी पाटीवर लावण्यात येतील.


 • २१ लाख रु. देणाऱ्या एका किंवा १० लाख ५१ हजार देणाऱ्या दोन सभासदांची नावे इमारती मधील आतील सभागृहास देण्यात येतील.
 • रु. २ लाख ५१ हजार देणाऱ्या व्यक्तीचे नाव नियोजित इमारतीच्या गळ्यावर / खोलीवर देण्यात येतील.

संघाचे मार्च २०१७ पासूनचे उपक्रम

 • २३ मार्च कै. दादासाहेब खाडे स्मृतीदिन सुरु करण्यात आला.
 • इमारतीचे सुशोभीकरण व सभागृह अद्ययावत करण्यात आले.
 • मागील इमारतीमध्ये सभेसाठी सभागृहाची व्यवस्था करण्यात आली.
 • सभेसाठी साउंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली.
 • वार्षिक अहवाल रंगीत मुखपृष्ठासह सुबक पद्धतीने प्रकाशित करण्यात आला.
 • शासकीय व निमशासकीय सेवेतुन निवृत्त झालेल्या समाजबांधवांचा गौरव करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला.
 • सन २०१८ ची दिनदर्शिका प्रथमच प्रकाशित करण्यात आली.
 • वधुवर सुचक मंडळ स्थापन करून वधुवर परिचय मेळावा घेण्यात आला.
 • तालुका/जिल्हा/राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार व गौरव करण्यात आला.
 • उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून खोल्यांचे सुशोभीकरण करून भाड्याने उपलब्ध करण्यात आले.
 • आयकर रिटर्न नियमित करून 80 G दाखला मिळवण्यासाठी पाठपुरावा करत आहोत .
 • कुणबी समाजोन्नती संघ, आर्ट ऑफ लिव्हिंग व LHV इंडियन असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यु यांचेकडुन गांडुळवाड, लेनाड, साकडबाव व वाशाळा येथील शाळांना लायब्ररी दिली.
 • १५ जुलै २०१८ रोजी गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त समाजबांधवांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

नियोजित कार्यक्रम

 • समाजसंघाच्या इमारतीचे नूतनीकरण करून गाळे व सभागृह उपलब्ध करून आर्थिक स्रोत निर्माण करणे.
 • MPSC/UPSC, व्यावसायिक मार्गदर्शन व वाचनालय विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध करणे.
 • शेतकऱ्यांना शेतीविषयक, शेतीपुरक, व्यावसायिक मार्गदर्शन करण्याची व्यवस्था, शिबीर, कार्यशाळा भरवुन करणे.
 • सामुदायिक विवाह पद्धतीस चालना देणे.
 • समाजाच्या चालीरीती, संस्कृती जपण्यास आवश्यक बदल करण्याकरीता उपक्रम राबविणे.
 • विवाहासाठी मंगल कार्यालय व मुला/मुलींसाठी वसतिगृहाची व्यवस्था करणे.
 • रोजगार मेळावे भरविणे.
 • वधुवर सुचक मंडळ स्थापन करण्यात आले असुन, समाज बांधवांनी समाज संघाच्या कार्यालयात अथवा वेबसाईट वर वधुवरांची नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा.

Our Portfolioसंपर्क

कार्यालय: कुणबी भवन - कचेरी रोड, शहापूर (ठाणे)